वृषभ दरोडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगांव : शहरात अतिक्रमन भागात व इतर ठिकाणी ग्राम पंचायत काळापासुन तुटलेले सिमेंट पोलवर व टेलीफोन खांबावर सि एफ एल पथदिवे आहेत .शहरात आवश्यक ठिकाणी लोखंडी स्ट्रीट लाईट पोल उभारणी व वायरींग प्रस्ताव तयार करण्याची मागणी शिवसेना माजी नगर सेविका मिना गायधने यांनी मुख्यधिकारी नगर पंचायत राळेगांव व जिल्हा नगर पालीका प्रशासन अधीकारी यवतमाळ यांचे कडे निवेदना द्वारे केली आहे .राळेगांव शहरातEESEL कंपनी ठेकेदारा कडुन LED पथदीवे देखभाली चे काम केल्या जात आहे .ठेकेदारा कडुन अतिक्रमन भागातील केबल द्वारे विद्युत पुरवठा असलेले सिमेंट पोल व टेलीफोन खांबावरील सिएफ एल पथ दीव्यांची देखभाल कंपनी ठेकेदारा कडुन केल्याजात नाही. शहरात सहा महिन्या पासुन लाईट बंद आहे तशी नगर पंचायत कडे नोंद आहे .बंद पथ दीव्यां बाबत संबंधित अधिकारी यांचे कडे लेखी व तोंडी विचारणा केली असता अधिकारी नियमांवर बोट ठेवुन आहे .तर नगर पंचायत करदाते नागरीक सहा महिन्या पासुन अंधारात आहे .शहरात प्रभाग क्र.2 प्रभाग 10 नगर पंचायत कडुन पायाभूत सुविधे साठी कोटी रुपये गुंतवणूक केलेला प्रभाग 12 शिवाजी नगर व शहरात अनेक ठीकानी टेलीफोन खांबावर केबल वरुन पथ दीवे आहेत .नगर सेवकां कडुन नगरपंचायत च्या सर्व साधारण सभेत याविषयी चा ठराव पारीत करण्यात आला होता. तर मुख्यधिकारी यांचे प्रभारात असलेल्या मारेगांव नगर पंचायत कडुन पथदीवे पोल उभारणी साठी जवळपास 48लाख रु.कीमतीचा प्रस्ताव तयार करुन मार्गी लावण्यात आला.त्याच धर्तीवर शहरात आवश्यक ठीकानी लोखंडी स्ट्रीट लाईट पोल उभारणी व वायरींग ई.चा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करावा.तसेच सहा महीन्या पासुन बंद असलेले स्ट्रीट लाईट विना विलंब सुरु करावे. अशा आशयाचे निवेदन शिवसेना माजी नगर सेविका मिना गायधने यांनी मुख्यधिकारी नगर पंचायत राळेगांव व जिल्हा नगर पालीका प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे कडे सादर केले आहे.


