सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील कासार खेड गावातील तरुण एकत्र येऊन लोकमान्य गणेश मंडळ स्थापन केली व आजपर्यंत ही परमपंरा कायम ठेवून कासार खेड येथे सार्वजनिक एकच गणपती मांडण्यात येत आहे.गावातिल व्यक्ती दरवर्षी स्व इच्छेने गणपती ची मुर्ती मंडळाला देत आहे.त्याला एकविस वर्षे पूर्ण झाले आहेत.सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरीही, तिसरी लाट येऊ घातली आहे.ती लाट जास्त धोकादायक आहे. म्हणून दरवर्षी कबड्डी व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून गावातील लोकांसाठी आरोग्य विषयक प्रबोधन करण्यासाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र कळबेंश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येईल. लसीकरण शिबीराचे आयोजन, आरोग्य विषयक शिबीर व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल उत्सव काळात गावात कोणतीही अनुचित घटना आजपर्यंत घडल्या नाहीत व पुढे ही घडू देणार नाही. एकोप्याने सर्व कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पालन करून च संपूर्ण उत्सव साजरा करण्यात येईल असे लोकमान्य मंडळ चे अध्यक्ष यांनी गावकऱ्यांच्या वतीने सांगितले आहे.











