सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यामधील साबरा येथील अनाथ आश्रमाला ह भ प रमेश अण्णा मुळे यांनी भेट दिली असता रोख 5000हजार रुपये व दर महिन्याला लागणारा किराणा देणार असल्याचे आश्वासन दिले. समाजसेवी व्यक्तिमत्व, गोर गरीबांचे तारण हार समजल्या जाणारे ,संभाजी नगर चे मुळे अण्णा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ह भ प रमेश अण्णा मुळे यांनी आज ह भ प सहदेव महाराज यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्था व अनाथ आश्रम ला भेट देऊन ५०००हजार रुपये मदत केली व तसेच भविष्यात ही किराणा स्वरूपात मदत करणार असल्याचे सांगितले ह भ प मुळे अण्णा यांचे कार्य बघून श्री खनेराज वारकरी शिक्षण संस्था व अनाथ आश्रम चे संचालक मंडळ भारावून गेले व त्यांचे कोटी कोटी आभार व्यक्त केले ,घरी वारकरी संप्रदाय ची परंपरा असल्याने ह भ प रमेश अण्णा मुळे यांनी नुकतीच गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान केली आहे व वारकरी संप्रदाय साठी भविष्यात खूप कार्य सेवाभावी कार्यासाठी तत्पर असणार असेही सांगितले.