गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गोडाऊन मधुन रेशनचा गहू तांदळाचा साठा काळ्याबाजारात जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या ठिकाणी कारवाई करून तब्बल 44 लाख आठ हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वतीने करण्यात आली आहे हिवरखेड येथील बस स्थानक जवळ असलेल्या गोडाऊनमध्ये गहू तांदूळ धान्य साठा कौशल किशोर गुप्ता यांच्या साथीदार सुरेश जगन्नाथ टावरी यांनी साठवून ठेवला होता सदरचा धान्य साठा काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी नेण्यात येत होता अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी हिवरखेड येथील बस स्थानक जवळ कारवाई करून समोर असलेला ट्रक क्रमांक एमएच 43 वाय 0778 मध्ये मंजूर शासकीय धान्याचे पोते भरताना मिळून आले आणि ट्रक च्या बाजूला वाहक क्रमांक एम एच 29 एटी 0035 .बोलोरो पिकअप क्रमांक एमएच 68 0174. टाटा 704 क्रमांक एमएच 04 सीयु 4927. वाहनांमध्ये शासकीय गव्हाचे 250 क्विंटल पोते वजन किंमत अंदाजे पाच लाख 8 हजार दोनशे रुपये शासकीय तांदूळ 276क्विंटल 85 किलो अंदाजे किंमत पाच लाख 53 हजार 700 रुपये शासकीय धान्य साठा मिळून आला आहे शिवाय गोडाऊन मध्ये दोन इलेक्ट्रिक वजन काटे किंमत वीस हजार रुपये दोन इलेक्ट्रिक सिलाई मशीन किंमत पाच हजार रुपये किंमत .सिलाई धागा तीनशे रुपये महाराष्ट्र शासनाचे शिक्के असलेले खाली बारदाना 295 नग किंमत वीस हजार रुपये एकूण 44 लाख आठ हजार 900 रुपये चा ऐवज हस्तगत केला आहे
गुन्हा या सहा आरोपीच्या नावे समावेश
कौशल किशोर गुप्ता वय 48 अकोट. सुरेश जगन्नाथ टावरी वय 60 रा तुकइथळ .मस्तान शहा शहा वय 40 चौहट्टा बाजार. साहिल खान रशीद खान वय24 तुकइथळ. अब्दुल मुजाहिद्दीन शेख अनिसोद्दीन वय38 रा बेलखेड. शहनाज खान उल्ला खान वय 23 रा. हिवरखेड यामध्ये आरोपी चा समावेश असून त्यांच्यावर कलम 3.7 जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे प्रमुख संतोष महाले. पीआय नितीन चव्हाण. पीएसआय गोपीलाल माळवे. राजपाल ठाकूर .गणेश पांडे. फिरोज खान .शक्ती कांबळे. संदीप काटकर. संदीप टाले. मनोज नागमते .अनिल राठोड गीता अवचार यांनी केली कारवाई.