- नायब तहसीलदार बदकी यांची कारवाई
वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव तालुक्यात सद्याच्या स्थितीत वाळूच्या तस्करांनी डोके वर काढ ल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. महसूल प्रशासनाच्या कारवायांनाही न जुमानता दिवसेंदिवस अवैध रेती तस्करीत वाढ होत आहे. यातूनच रेती तस्कर किती निर्ढावलेले आहेत याचा प्रत्यय येतो.आज गुरूवार दि.१२ ऑगष्ट २०२१ रोजी दुपारच्या सुमारास वालधूर रेती घाटावर अवैधरित्या रेती चोरी करून नेण्याकरिता आलेला ट्रॅक्टर महसूल विभागाचे नायब तहसीलदार दिलीप बदकी यांनी महसूल कर्मचाऱ्या सह ट्रॅक्टर जप्त करून त्यावर कारवाई केली. रामगंगा नदीचा प्रवाह सावंगी मार्गे वालधूर गावाकडे जातो. नदीचे पात्र मोठे असल्याने रेती साठा बऱ्या प्रमाणात आहे. दरम्यान एक ट्रॅक्टर रेती उपसा करण्याकरता आल्याची बातमी महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी, तलाठी सौरव तुमसकर, तलाठी तिरणकर, यांना घेऊन रामगंगा नदीच्या पात्रात ‘वालधूर’ घाटावर जाऊन एम एच 29 .AK .0313 रेती भरून नेत असताना पकडला. ट्रॅक्टर चालक सेवाकर लक्ष्मण नान्हे असून सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसीलमध्ये लावण्यात आला. रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर हा गौरव सुनील जिड्डेवार यांच्या मालकीचा असून या आधीही रेती तस्करी प्रकरणी कारवाई करणाऱ्या तलाठी यास शिवीगाळ केल्याचे प्रकरण त्याच्यासोबत झाले आहे. रेती चोरीचे प्रकार बर्याच दिवसापासून सुरू आहे. महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या डोळ्यात धूळफेक करून रेती तस्कर रेतीची चोरी करतात व वरून महसूल व पोलीस कर्मचारी यांना वेठीस धरण्याचे काम हे करीत आहे.


