गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील माळेगांव बाजार येथे आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑफ सोसायटी लि. नागपूर शाखा – तेल्हारा यांच्या वतीने “GO GREEN GO NEEM ” योजने अंतर्गत 1500 निम वृक्ष लावण्याचा उपक्रम राबवत आहे . दि. 14.08.2021 रोजी आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटी लिमिटेड नागपूर शाखा- तेल्हारा कर्मचारी व ग्रामपंचायत माळेगाव येथील गावकरी मंडळी यांच्या सौजन्याने झाडे लावण्याचा उपक्रम संपन झाला.संस्थेचे कर्मचारी मॅनेजर श्री लोकेश अग्रवाल सर , मिस. कल्पना ढोले , पवन सोळंके, गिरीश बाळापूरे , स्वप्नील फोकमारे, अक्षय ठाकरे, गजानन मोरखडे, तसेच दैनिक प्रतिनिधीं शिवहरी बाहे, सूरज नगरे, दिनेश वाघ, संतोष घोगले, कैलास रत्नपारखी, सूरज नागोलकर, संतोष टेकाडे उपस्थित होते माळेगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत 300 निम वृक्ष लावण्यात आली. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.