सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : भोंदवडे येथे दि. 19 नितीन गुजर (वय 38)) विजेचा शॉक लागून मृत्यू. सदर व्यक्ती खाजगी वाहन चालक होती. व्यवसाय वृद्धी करण्याकरिता, त्यांनी नवीन वाहन धुण्याचे सर्व्हिसिंग सेंटर चालू केले. व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाची सुरुवात स्वतःच्या वाहना पासून करायची, म्हणून त्यांनी उत्साहात सर्व्हिसिंग सेंटरवर स्वतःचे वाहन धुन्यास घेतले. वाहन धुत असताना, अचानक विद्युत उपकरणा मधील काही तांत्रिक बिघडा मुळे त्यांच्या हातात असलेल्या सर्व्हिसिंगच्या उपकरणांमध्ये विद्युत पुरवठा प्रवाहित झाला आणि त्यांना जोराचा शॉक लागून ते सर्व्हिसिंग सेंटरच्या तीन फूट खोल खड्यात कोसळले, यामध्ये शॉक लागून डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. असे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.











