सय्यद मुहाफिज
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरून चक्क एका युवकाची तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरांमध्ये घडली आहे. ओमकार पांडुरंग भागानगरे असे हत्या केलेले युवकाचे नाव असल्याचे समजले आहे.ओमकार भागानगरे आणि त्याचे मित्र रात्री बालिकाश्रम रोड या ठिकाणी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होते यावेळी अचानक नंदू बोराटे, गणेश हूच्चे आणि संदीप गुडा हे दुचाकी वरून त्याच्या जवळ आले आणि तिघांनी ओंकार भागानगरे यांच्या हातावर आणि पोटावर तलवारीने वार केले या हल्ल्यात ओमकार भागानगरे याचा जागीच मृत्यू झाला आहे.आणि त्याचा मित्र शुभम पडोळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.दरम्यान या प्रकरणी ओंकार घोलप यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गणेश हुच्चे, नंदू बोराटे आणि संदीप गुडा या तिघांविरोधात गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या घटनेने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.


