शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे,पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेशचंद्र सोळंखे,पो.कॉ.सुनील वराडे,पो.कॉ.गोपाल जाधव असे शासकीय वाहनाने आसेगावं बाजार परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना दुपारी 11:45 वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की मालधुरे नावाचा इसम त्याचे मोटरसायकलवर कवठा ते आसेगाव बाजार रोडणे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घेऊन जाणार आहे. अशा गोपनीय माहिती मिळाल्या वरून पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांनी सदरची माहिती पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,यांना देऊन त्यांचे आदेशाने दोन पंचांना घेऊन नाकाबंदी करून मोटार सायकलवर अवैध गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे अनिल रघुनाथ मालधुरे वय 66 वर्ष,रा.नंदिपेठ अकोट याला त्याची मोटर सायकल हिरो एच एफ डीलक्स क्रमांक एम एच 30 ए एल 24 76 सह ताब्यात घेऊन त्याचे मोटरसायकलवर असलेल्या थैल्यांची झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला 20, 190 रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मिळून आला. 20,190/- रू चा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व चाळीस हजार रुपयाची मोटरसायकल असा एकूण 60,190,/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.संदीप घुगे,मा.मोनिका राऊत अपर पोलीस अधीक्षक अकोला,मा रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, व नितीन देशमुख पोलीस निरीक्षक अकोट ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे,पो.हे.कॉ.उमेशचंद्र सोळंके,पो.कॉ.सुनील वैराळे,पो.कॉ. गोपाल जाधव यांनी केली.