बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : राजेगाव तालुका दौंड येथील तलाठ्याचा महाकारनामा पाहिला मिळाला अवैद्य वाहतूक करणारे विटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीने भरलेले पकडलेले ट्रॅक्टर सोडून दिले .गाव कामगार तलाठी दिपक आजबे राजेगाव यांनी राजेगाव फार्म तालुका दौंड येथे रात्री एक वाजता विटभट्टीसाठी लागणारी माती वाहतुक करणारे पकडलेले .2.ट्रॅक्टर धनलक्ष्मी घेऊन सोडून दिले आहेत. अशी राजेगाव परीसरात जोरदार चर्चा रंगु लागली आहे.आजबे गावकामगार तलाठी मध्यरात्री काळ्याकुट्ट आंधारात ज्या ठिकाणी दिवसा जाण्याची कोणी हिंम्मत करत नाही तेथे रात्री 1 वाजता कशासाठी गेले. आणि गेले तर तेथे विटभट्टीसाठी माती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडले आणि लगेच सोडून का दिले . कोणाच्या दबावाखाली सोडले का धनलक्ष्मी ने धावा घेतला हे मात्र अतिशय गुलदस्त्यातच असुन याची खमंग चर्चा जोरात चालू आहे. हे महाश स्वतः महसूलमंत्री असल्यासारखे वागतात दररोज मध्यरात्री यांचा दिवस चालू होतो हे दररोज भिमा नदीच्या किनारी रात्रीच्या वेळीच का फिरतात .यांच्या आँफिसमध्ये कोतवाल असताना झिरो कोतवाल घेऊन का नदीच्या किनारी मध्यरात्री आसतात..या महाशयांना कोणाचा वरदहस्त आहे का असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.भिमा नदीच्या पात्रालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असल्याने नदीचा प्रवाह बदलून मोठी हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच भिगवण. राशीन रोडवरील एस टी पुलास धोका निर्माण होवू शकतो.पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यावर वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माती माफीया राजरोसपणे उजनी क्षेत्रातुन मातीची तस्करी करुन लाखो रुपये शासकीय अधिकारी यांच्या जिवावर कमवत आहेत. राजेगाव परीसरातुन शासकीय मालमत्तेची लाखो रुपयांची लुट करत आहेत .तरी महसूल विभाग आणि भिमा पाटबंधारे विभाग मुग गिळून का बघ्याची भुमिका घेत आहे हे मात्र न सुटणारे कोडे आहे. या संबंधित नायब तहसिलदार दौंड दिवटे यांना संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.


