अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वर्ग बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून आज वर्ग बारावीचा इंग्रजीचा पेपर झाला. या पेपरमध्ये प्रश्न 3 (A) या कवितेवर आधारित प्रश्नांमध्ये A3 , A5 मध्ये प्रश्न न देता एक्सेप्ट एनी रिजनेबल आंसर असे लिहिले आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी लिहिलेले उत्तर हे प्रश्नाला अनुसरून असेल तरच त्या उत्तराला गुण द्या असा होतो,परंतु त्या ठिकाणी प्रश्नच विचाराला नव्हता व A4 मध्ये प्रश्न न विचारता प्रत्यक्ष उत्तरच दिलेले आहे.प्रश्न पत्रिकातील या घोडचुकींमुळे विद्यार्थी हे गोंधळात पडले होते. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील या चुकींमुळे विद्यार्थ्यांना बोनस ०६ मार्क मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.