अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : यावर्षी सम्पूर्ण भारत देशात 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतांना स्वातंत्र्य अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट प्रयन्त राबविण्यात येत आहे. तरी या अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी होऊन घरोघरीं तिरंगा फडकविण्याविषयी जनजागृती ग्राम नांदखेड येथे मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र च्या माध्यमातून करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य ला 75 वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत तेवत राहाव्यात ,स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे ,तसेच स्वातंत्र्य साठी चेतवलेली स्फूर्ती कायम तेवत राहावे व देशभक्ती ची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यासाठी गावा गावातील कुटुंबियांनी या उपक्रमात सहभागी व्हावे याबाबत मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र व्यवस्थापक किशोर चक्रनारायण, क्षेत्र समन्वयक संगीता अवचार , ग्रामीण वित्तीय सल्लागार देशना उपर्वट करीत आहेत.