वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : शहरात गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली शिव भोजन थाळी त्वरित उपलब्ध करून थाळी संख्येत वाढ करा शिवसेना माजी नगरसेविका मीना गायधने शहरात सहा महिन्यापासून बंद असलेले शिव भोजन केंद्र त्वरित सुरू करून भोजन थाळी संख्येत 75 वरून 150 वाढ करण्याची मागणी शिवसेना माजी नगरसेविका मीना गायधने यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे राळेगाव शहर तालुक्याचे ठिकाण असून बाजारपेठ आहे ग्रामीण भागातून नागरिक तालुक्याचे ठिकाणी शासकीय कामासाठी आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी ये जा करीत असतात शहरात अत्यंत अल्प दरात महाराष्ट्र शासनाकडून भोजन देणारे शिव भोजन केंद्र जवळपास सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकरी बांधव नागरिक बंधू-भगिनी तसेच हातावर आणून पानावर खाणारे मजुरांची गैरसोय होत आहे शहरात 75 थाळींना शासनाची मंजुरात आहे सीसीटीव्ही सहित सर्व निकष पूर्ण करणाऱ्या संस्थेला बचत गटात कंत्राटदारास लवकरात लवकर शिवभोजन थाळी सुरू करण्याची परवानगी देऊन थाळीची संख्या 75 वरून 150 करण्यात यावी नियम व अटीचे भंग करणाऱ्या केंद्र चालकास परवानगी देण्यात येऊ नये अन्न घटकांची तसेच साफसफाई व इतर बाबीचा दर्जा संबंधित अधिकारी यांच्याकडून तपासणी वेळोवेळी करून घेण्यात यावी केंद्र चालक बोगस लाभार्थ्याची नोंद करणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी शिवसेना माजी नगरसेविका मीना शंकर गायधने यांनी पत्राद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे.