वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ जिल्ह्य़ातील
राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे
पहिल्याच पावसाने वडकी सह परिसरात दमदार सुरुवात केली. मात्र कोसळणार्या पावसाच्या सरीत विद्युतपुरवठा मात्र सातत्याने खंडित होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वडकी महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वडकी सह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार – पाच दिवसांपासून वडकी गावत नागरिकांना रोज चार ते पाच घंटे अंधारात काढावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तर उर्वरित असणारे रोहित्रही देखाभाली अभावी लोटून गेल्याचे परिसरात अनेक ठिकाणी आढळून येत आहे. यामुळे वडकी तसेच परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला असून नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागला आहे. याकडे समंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाईची मागणी वडकी सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. दिवस रात्र चार चार घंटे विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वडकी विज वितरण कंपनीचा बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वडकी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. वडकी महावितरण अधिकाऱ्यांच्या नियोजन व देखभाली अभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. वडकी परिसरातील ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. वडकी सह परिसरातील उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे