किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : शहराचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यात्रा उत्सव 10 दिवस कीर्तन टाळ-मृदंगाच्या आवाजाने दुमदुमली पातुर नगरी यात्रा उत्सवा निमित्य दहा दिवस किर्तन व भागवत च्या स्वरूपात होतो ईश्वर नामाचा गजर यात्रा उत्सवाला मराठी नववर्ष गुढीपाडवा ला सुरूवात होऊन दहाव्या दिवशी यात्रा उत्सवाचा निरोप दहीहंडीचा, व महाप्रसाद, वितरण करुन केला जातो अनेक दशकापासून परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा पातुर पंचक्रोशीतील हजारो भक्तगण भक्तीत तल्लीन झाले यात्रा उत्सवा मध्ये पातुर शहरातील अनेक मार्गाने दहीहंडी हे बैलगाडा तसेच वाजंत्री ने वाजवत पातूर शहरातील व्यायाम शाळा, सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात भाग घेऊन दहीहंडी काल्याचा महाप्रसाद वितरण करतात व घरगुती दहीहंडी घेऊन भक्तगण गोविंदा गोविंदा गजरात महाप्रसाद वितरित करतात अशी परंपरा कायम ठेवत पातुर पंचक्रोशीतील पातूर शहरातील भाविक तसेच तालुक्यातील भाविक संत सिदाजी महाराज यात्रा उत्सव साजरा करतात परंपरागत संत श्री सिदाजी महाराज यात्रा उत्सव महाराजांची दिंडी शहरातून मुख्य मार्गांनी काढून टाळ मृदुंग व अभंगाच्या वाणीने संत श्री सिदाजी महाराजांचा गजर करत निघतांना पातूर शहरातील महिलावर्ग मुख्य मार्गावर रांगोळ्यांच्या सुरुवात महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या प्रमाणात करतात जवळजवळ हा सोहळा पातुर तालुक्यात सर्वात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण हे 55 ते 60 क्विंटल चा करून पातूर पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात या वेळी पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या प्रमुख मार्गदर्शना मध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला शहरातील , संत सिदाजी महाराज पंचमंडळ, विविध सामाजिक संघटना तसेच व्यायामशाळा व तरुण युवक, महिलावर्ग उत्साहाने सहभागी होतात अशाप्रकारे संत सिदाजी महाराज यात्रेचा समारोप उत्सवाने साजरा होतो