अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : न.प.प्राथ मराठी शाळा क्र.1 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून त्यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. मुलांना फराळ वाटप करण्यात आला.कार्यक्रमचे अध्यक्ष श्री.प्रविण प्रकाश पोहरे, उपाध्यक्ष शा. व्य. समिती, प्रमुख उपस्थितीत स्वाती प्र. गाडगे, वैशाली बोंबटकार,सौ समिक्षा वानखडे,ललीता सिरसाट, प्रविण पोहरे,भीमराव पोहरे होते. कार्यक्रम साठी ना.भ. झाडोकार मुख्याध्यापक, स्वाती जोशी संचालन कु.अनिता तंबाखे आभार प्रदर्शन कु.स्वाती गाडगे, सुरेखा राठोड शिक्षिकांनी व शापोआ कर्मचारी यानी परिश्रम घेतले.











