किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
ज्या व्यक्तीची रक्कम असेल त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया पातूर शाखेचे मॅनेजर कपिल परिहार साहेबांन शी संपर्क करावा असे आवाहन
पातूर येथील सुरेश शेषराव म्हैसणे ,,
व
डॉ ओम प्रकाश धरर्माड यांनी केले आहे
पातूर दिनांक 23/03/022 बुधवारी रात्री 8,17 वाजता सुरेश शेषराव म्हैसणे हे एसबीआय बँक लगत ATM मध्ये रक्कम व्यवहार करण्याकरिता गेले असता त्यांना ए टी एम मशीन वर पाचशे रुपयांचा च्या 5000 हजार रुपये रक्कम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी आज दिनांक 24 /3/ 2022 डॉ, ओम प्रकाश धरर्माड यांच्याशी संपर्क करून त्यांनी या पाच हजार रुपये रकमेचे परत देण्याचे ठरविले व एक रीतसर अर्ज बँक ऑफ इंडिया शाखा पातूर च्या नावाने लिखित बँक मॅनेजर कपिल परिहार साहेब यांच्या स्वाधीन करून या पाच हजार रुपये ज्या व्यक्तीचे राहिले असतील अशा खऱ्या मालकाला हि रक्कम मिळावी अशी इच्छा सुरेश म्हैसने व डॉ ओमप्रकाश धरर्माड यांनी व्यक्त केली आहे यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर कपिल परिहार, बँक कर्मचारी शैलेश गणेशे, सुरेश म्हैसने, डॉ ओमप्रकाश धरर्माड, किरण कुमार निमकंडे, रंजीत गाडेकर, स्वप्निल अंधारे, हे उपस्थित होते