मुख्याधिकारी न.प.भद्रावती यांचे कडे मागणी
घनश्याम आस्वले युवासेना तालुका समन्वयक
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.24 :-21-03-2022 ला शिवसेना शहर प्रमुख नंदू पढाल यांच्या मार्गदर्शनात युवासेना तालुका समन्वयक घनश्याम आस्वले यांच्या नेतृत्वात भद्रावती शहरातील किल्ला वार्ड प्रभाग क्र ८ येथील जनता विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. या वार्डातील रस्ते पूर्णतः खराब झाले असून रस्त्यावरील गिट्टीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या वार्डातील नाल्यासुद्धा उघडया असल्यामुळे आणि त्या साफ होत नसल्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या जीवघेण्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. नाल्यावरील चेंबर फुटल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच फेअरी लँड शाळेसमोर खेळाचे मैदान असून या मैदानात हायमाँक्स देण्यात यावा तसेच इतर समस्या त्वरित सोडविण्यात याव्या अशी मागणी जनतेकडून होत असल्यामुळे घनशाम आस्वले युवासेना तालुका समन्वयक भद्रावती यांनी पुढाकार घेऊन निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती यांना त्वरित समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी राजूभाऊ सारंगधर नगरसेवक न.प भद्रवती बाळा शिरसागर शिवसेना उपतालुका प्रमुख,भद्रावती गौरव नागपुरे युवासेना शहर समन्वयक भद्रावती, येशू आरगी, सतीश आत्राम, अरुण दाते तसेच शिवसैनिक उपस्थित होते
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)