किरण कुमार निमकंड
जिल्हा प्रतिनिधी अकोला
श्री क्षेत्र पातुर येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा अकोला जिल्ह्यातील आलेल्या वारकरींच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात संत सिदाजी महाराज मंदिर परिसरात पार पडला.
तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस.फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. यावर्षी हा दिवस २० मार्च या दिवशी आहे. हा दिवस म्हणजेच या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्या, तसेच आपल्या अभंगातून सार्या ब्रह्मांडाला उद्धारण्याचे सामर्थ्य असणार्या संत तुकारामांची महती तसेच संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे ग्रहण लागले होते परंतु यावर्षी वारक-यांमध्ये खुप उत्साहाचे वातावरण होते.
संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला.
तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होती. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्यदैवत होते. जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा ! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले. संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले.
व छत्रपती शिवाजी महाराजांनी सुदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना गुरुचे स्थान दिले संत तुकाराम महाराज यांच्या या देशाला अनेक अभंगाच्या माध्यमातून देशातील भावी पिढीला , सर्व धर्मीयांना आदर भावाचा मार्ग दाखविला
!! तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम !!
श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्य पातूर पंचक्रोशीत टाळ मृदंग गजराच्या आवाजाने किर्तन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी ह-भ-प हरिदास महाराज बावस्कर कंचनपुर यांच्या कीर्तनाचा सोहळा पार पडला व या वेळी ज्ञानदेव थोटे, दिलिप चांदणे,डॉ प्रशांत लोथे , विठ्ठल लोथे गुरुजी, ह.भ.प नारायण राव फुलारी , शामराव फुलारी,मृदुंग व टाळकरी ह.भ.प गजानन महाराज गिरे, ह.भ.प संजय राऊत, संगीतकार सुधाकर उगले , सुधाकर भाकरे गुरुजी, संजय भगत, ह.भ.प राजू महाराज कोकाटे, सुरेश , सत्कार, हरी काळे, राजू महल्ले, मेतकर, प्रफुल भालतीलक, नारायण झाडोकार, सुरेश माऊलीकर, टाळकरी महादेव खरप,पिपळखुटा, सुनील वावघे, कृष्णा अंधारे, लक्ष्मण बारताशे, अक्षय गाडगे, वाहाळा येथील टाळकरी , तांदळी येथील टाळकरी , उपस्थित होते