राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
बोईसर रेल्वे स्थानकावर बुधवारी सायंकाळी मालगाडी खालून एक व्यक्ती पटरी ओलांडत होता. त्याक्षणी मालगाडी सुरू झाली आणि तो व्यक्ती गाडी खाली सापडला. ही घटना बघून प्रत्येकाच्याच काळजाचे ठोके चुकले. परंतु सुदैवाने अनर्थ टळला. या घटनेकडे बघून काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणता येईल.
बुधवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास प्लॉट क्रमांक 1 वर मालगाडी सायडिंगला थांबली असता एक व्यक्ती गाडी खालून पटरी ओलांडत होता. त्या क्षणी मालगाडी सुरू झाली आणि तो व्यक्ती गाडी खाली सापडला. हे बघून उपस्थितांच्या काळजाचे ठोके चुकले. काय घडते याकडे प्रवाशी बघत होते. तर काही आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ बनवण्यामध्ये गुतले. तो व्यक्ती गाडी सुरु होताच रेल्वे रुळाच्या मधोमध झोपला आणि काही जण पळत जाऊन स्थानक व्यवस्थापक काकडे या घटनेची कल्पना दिली. व्यवस्थापकाने क्षणाचाही विलंब न करता मालगाडी थांबवली. आणि होणारा अनर्थ टळला व त्या व्यक्तीचा जीव वाचला.