अमरावती : शहरातील अमरावती-नागपूर महार्गावर अर्जुन नगर परिसरात खासगी बस नाल्यामध्ये उलटली आहे. मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमधील बैतुलकडे ही खासगी बस जात होती. ही बस थेट नाल्याच्या आतमध्ये शिरल्याने बसमधील प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला. आज सकाळी ही घटना घडली. काही प्रवासी यात किरकोळ जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर वाहन चालक पळून गेला. बस रस्त्याच्या बाजूला पडून होती. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. काही जण या अपघातात किरकोळ जखमी झाले. पण, पलटी झाल्याने बसची अशी अवस्था झाली. अमरावतीतील अर्जुननगर परिसरातील घटना घडल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलीसही घटनास्थळी पोहचले. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत. त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून होती. अशातच अमरावती शहरात अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. लहान चिमुकले बचावले. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा असा अंदाज आहे.











