किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : जिरायत पातूर येथील मरिमाता शेतशिवारात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दि.28/01/2022 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान पातूर येथील नानासाहेब मंदिरानजीक मरिमाता शेतशिवारात प्रकाश निमकंडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतक युवकाचे नाव धीरज साहेबराव सोनोने (वय 26) रा.नानासाहेब नगर ,पातूर येथील रहिवासी असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे राम आंबेकर, पंजाबराव चराटे, दिलीप तिवारी,सचिन पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.