राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – राखीव वन कक्ष क्रमांक 106 मिरकल नियत क्षेत्र पेरिमिली रेंज, आलापल्ली वनविभाग आलापल्ली व गडचिरोली वनवृतांतील मिरकल ते साकीनगट्टा रस्ताचा कामी संबंधित कंत्राटदराने 5780 ब्रास मुरूम जून ते डिसेंबर 2021 मध्ये अवैध उत्खननासह वृक्ष तोड जैवविधाता नष्ट केलेली आहे. हे वनविभागाला माहित असूनही तब्बल 6 महिने वनगुन्हा जारी न करता डिसेंबर 2021 पर्यंत पुरावे नष्ट करण्यासाठी उपवनसंरक्षक आलापल्ली वन विभाग आलापल्ली, ते नियत वनरक्षक मिरकल यांनी गैर कृत्य केलेले आहे. ही बाब घटना बाह्य राजद्रोह व संघटित गुन्हेगारीची कृत्ये ठरतात. म्हणून तातडीने फौंजदारीं व दिवाणी कायदे नियम व संहितेचा तरतुदीनुसार दोषी असलेल्या महसूल व वनअधिकारी यांना निलंबन बडतर्फीसह जबर फौंजदारी कारवाई करण्यात यावी असे निवेदन मुख्यवनसंरक्षक गडचिरोली यांना 24/12/2021 दिले परंतु एवढे दिवस उलटूनही कुठलीही चौकशी, कारवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. सदर चौकशी सात दिवसात झाली पाहिजे अन्यथा शिव सैनिक उपोषणास बसणार असा इशारा विलास पोचमपल्लीवार जेष्ठ शिव सैनिक व मा.ग्रा.प. सदस्य तथा जेष्ठ शोवसैनिक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ग्लोरी आफ फॉरेस्ट ला लागून असलेल्या रिझर्व फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 106(राखीव वन कक्ष क्र 106)मध्ये शेकडो वृक्षतोड, अनधिकृत पणे खोदकाम करून ती मौल्यवान सागवान वृक्षाचे लाकूड संबंधित कंत्राटदार परस्पर गहाड केलेले आहे. हे माहित असूनही उपवनसंरक्षक आलापल्ली, सह.वनसंरक्षक आलापल्ली व वन परिक्षेत्र अधिकारी पेरमेली यांनी संघटितपणे संबंधित कंत्राटदारचा गुन्हेगारी कृत्यांना सतत संरक्षण दिलेले आहे. राखीव वन कक्ष क्र 106 मध्ये जाहीर पणे रस्ते रुंदीकरण व माती/मुरमावर शासन किमतीवर आयकर, जिएसटी, स्टम्प ड्युटी, व्यवसाय कर इ. वसुल करून शासन तिजोरीत जमा करने अनिवार्य असताना तशी कारवाई न करता त्या वन जमिनीवर अवैध उत्खननासह वृक्ष तोड केलेली आहे. मंजूर कार्य आयोजनेतील तरतुदी नुसार स्टॉक मॅपिग व इन्यूमरेशन डाटा व स्टॅम अन्यालेसिस नुसार उभा वृक्षाची संख्या व सदर कामी वापरण्यात आलेल्या वनक्षेत्राचे क्षेत्र याची सांगड उपवनसंरक्षक आलापल्ली सहायक वनसंरक्षक आलापल्ली, वनक्षेत्रपाल पेरमेली वनपाल व बीट वनरक्षक मिरकल, साकीनगटा यांनी अत्यल्प नुकसान कंत्राटदार केलेले असल्याचे दर्शविण्यासाठी तब्बल प्रकरण 6 महिने दाबून ठेवलेले होते हे सिद्ध होते. म्हणून याची गंभीर दाखल घेउन वरील सर्व दोषी विरुद्ध, वनगुन्हा उशिरा दाखल करणाऱ्या उपवनसंरक्षक ते नियत वनरक्षक मिरकल यांचा विरुध्द गुन्हा दाखलसह बुडीत नक्तमूल्य रकम चक्रवाढ व्याजासह वसुल करण्यासाठी इडी, NIA, RAW, IB, सीबीआय, ACB, State & Central Investigation agencies यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, सदर निवेदनाला एक महिनाचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारचा कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सदर चौकशी सात दिवसात झाली पाहिजे अन्यथा शिवसैनिक उपोषणास बसणार असा इशारा विलास पोचमपल्लीवार जेष्ठ शिव सैनिक तथा मा.ग्रा.प.सदस्य आलापल्ली यांनी असे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.











