महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करीत राहील अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे नवनियुक्त राज्य सचिव करण संजय देवतळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यांची राज्य कार्यकारिणीत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, महाराष्ट्र प्रदेश भाजयुमोचे अध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार मानले असून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.











