नक्षलीवर शासनाने जाहीर केले होते २ लाख रूपयांचे बक्षीस.
गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची कारवाई.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणारे पोलीस मदत केन्द्र गट्टा (जांभिया)हद्दीत दि.14 जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांभिया)जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जांभिया) व सीआरपीएफ बटालियनची जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.नक्षल दृष्टया अति संवेदनशिल असलेले गोरगुडा येथील रहीवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय 30 वर्षे ता.एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र.14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता.तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता.सन 2008 रोजी पोलीस स्टेशन भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा हत्या त्याचा सहभाग होता.उप पोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन 2010 रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता. सन 2009 रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता.त्याच बरोबर दि. 14 आँगस्ट 2020 रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता.दि.11 जुन 2020 रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन 2021 मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच दि.18 सप्टे 2021 मध्ये रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याची हत्यामध्ये, दि. 26 फेब्रू 2021 रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व दि.3 एप्रिल 2021 रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच दि.11जानेवारी 2022 रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्रात सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असुन त्याच्यावर खुनाचे 06,चकमक 04,दरोडा 02,जाळपोळ 03,अपहरण 01,असे एकुण 16 गुन्हे दाखल आहेत.त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 2 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.या व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
सदर अभियान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक (अभियान)सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक(प्रशासन) समीर शेख,अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडले.पोलीस अधिक्षक यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.