किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला (दि.४ फेब्रुवारी २०२२)-
प्रा मनोहर आत्माराम वासनिक मुळ गांव बेलमंडळ ता. जि. कारंजा आणि सध्या कोठारी वाटीका क्र.२ मलकापुर, अकोला येथे वास्तव्यास असणारे आणि स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगांव जि बुलढाणा येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हनुन गेल्या १२ वर्षांपासुन पूर्णवेळ कार्यरत असणारे आणि महाविद्यालयातील आय क्यु ए सी चे समन्वयक म्हनुन कार्य करीत असणारे प्रा मनोहर आत्माराम वासनिक यांना नुकताचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर द्वारा “A study of Feminist elements in the plays of Vijay Tendulkar “ या विषयावर नागपुर विद्यापीठाचे डॅा अमोल राऊत सर यांच्या मार्गदर्शनात पि एच डी पदवी ने सन्मानीत केले आहे. प्रा मनोहर वासनिक यांनी या आधी इंग्रजी विषयात सतत दोनवेळेस राष्ट्रीय स्तरावरील नेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे.हे विशेष एक शांत संयमी आणि जबाबदार नागरीक म्हनुन ते समाजात प्रसिध्द आहेत.त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, आणि आपल्या परिवाराला दिले आहे.प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, प्राचार्य डॅा निलीमा देशमुख, प्रा रुपेश देशमुख, प्रा दिनेश इंगळे,
डॅा शैलेश सोनोने, डॅा दिपक वानखडे, प्रा राहुल माहुरे, प्रा प्रकाश गवई, प्रा प्रकाश बागडे, प्रा ॲड आकाश हराळ, नितुराज गवई, रोशन गजभिये, कुणाल मेश्राम, विशाल इंगळे, विशाल नंदागवळी, राहुल कुरे, अमीत लोंढे, आदित्य बावनगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांच्या या यशामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)