सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी
अनसिंग:- भारत देशाचे अंतिम हृदयसम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या निर्देशकाचा चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामसिंह गैरवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. काही दिवसांमध्ये यशराज फिल्म बॅनरच्या माध्यमातून संपूर्ण देशात देशाचे अंतिम हृदय सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनपटावर एक चित्रपट प्रदर्शित होत असून सदर चित्रपटांमध्ये हृदयसम्राट असा उल्लेख न करता पृथ्वीराज असा एकेरी उल्लेख करण्यात आला यामुळे
संपूर्ण देशात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहे तेव्हा आम्ही सांगू इच्छितो की यशराज बॅनरने हा जो विषय केला आहे त्याचा करणी सेना द्वारे आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आमच्या सर्व हिंदूंच्या यामुळे भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे सदर चित्रपट एकेरी नावाने प्रदर्शित झाला तर आम्ही सर्व जण रस्त्यावर उतरून हा चित्रपट बंद पाडू असा इशारा त्यांनी करणी सेनेच्या वतीने देण्यात आला