सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : जैन धर्मीयांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्येप.पू.गणाचार्य विराग सागरजी महामुनीराजांचे आज्ञानुवर्ती शिष्य प. पू. वात्सल्यशिरोमणी श्रमण मुनिश्री विशेष सागरजी गुरूदेव ससंघ तथा प.पू. १०५ क्षुल्लकजी श्री विश्वमार्दव सागरजी महाराजांचे कारंजा येथून २ डिसेंबर रोजी शेलुबाजार मार्गे विहार होऊन ४ डिसेंबरला मालेगाव येथे सकाळी ९ वाजता आगमन होणार आहे. त्यामुळे समस्त जैन बांधवांकडून आनंद व्यक्त होत आहे.मालेगाव येथे ६ डिसेंबर रोजी उपसर्ग विजेता, युग प्रतिक्रमण प्रवर्तक प. पू. गणाचार्य विरागसागरजी महामुनीराज ३९ वा मुनी दिक्षा दिवस व पद्म प्रभू विधान होणार आहे. मांगलिक कार्यक्रम सकाळी ८ वाजता मंदिर पासून शोभायात्रा, ९ वाजता अभिषेक पूजन व पद्म प्रभू विधान, १ वाजता चित्रानावरण, दीप प्रज्वलन आचार्य श्री पूजन विनयांजली, दुपारी २ वाजता पू. मुनिश्रीचे प्रवचन, ३ वाजता पासून पंचकल्याणक बोली व सायंकाळी ६ वाजता गुरु भक्ती व आरती आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य मुनीश्री १०८ विशेष सागरजी महाराजांचा विशेष प्रभाव असून त्यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. यात प्रामुख्याने वाशिम जिल्ह्याच्या जवळील हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे महाराष्ट्रतील प्रथमच ३१ फ़ूट उंचीची भगवान बाहुबली मूर्तीचे निर्माण कार्य सुरू आहे.. तसेच महाराष्ट्रात सावदा, धामणगाव, सिंदखेडराजा, पुसेगाव, रिसोड, मुळावा इत्यादीचा समावेश आहे. सकल दिगंबर जैन समाज मालेगाव यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, आगमन प्रसंगी व धार्मिक कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहावे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)