21 नोव्हेंबर पासून वीज जोडणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची हरभरा गहू व इतर पीक पडली होती कोरडी
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शहरातील असंख्य शेतकऱ्यांना महावितरण वरील खंडित वीज केल्यामुळे नाहक त्रास होत होता त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांना संपर्क केला. ह्यावेळी त्यांनी शहर अध्यक्ष प्रमोद डोंगरे ह्यांनी पातूर येथील महावितरण कार्यालय येथे शेतकऱ्यां समवेत दिनांक 24 नोव्हेंबर रोजी महावितरण कार्यालय गाठले व कार्यलयातून उपअभियंता पातूर खुमकर,व अभियंता राठोड ह्यांना आताच्या आता शेतकऱ्याची वीज जोडणी न दिल्यास तात्काळ ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका घेतली भूमिका घेताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज जोडणी करून दिली त्यामुळे महावितरण चे आकाश हिवराळे ह्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आभार मानले व ह्यापुढे बिल भरून सुद्धा शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शेतकऱ्याच्या सोबत राहील असे आव्हान केले.











