अकोला, दि.18 – सामाजिक न्याय विभागामार्फत अकोला येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतीगृहात प्रवेशाकरीता शुक्रवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती अकोला येथे प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल डी.बी. बोथिंगे यांनी केले.











