गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु येथिल पंचायत समिती सदस्या सौ.उज्वला हेमराज काळपांडे यानीआज दि. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रध्देय एडवोकेट. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेसच्या तेल्हारा प. स. सदस्य सौ. उज्वला हेमराज काळपांडे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.माळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सौ. उज्वला हेमराज काळपांडे यांच्या प्रवेशाने तेल्हारा तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी खुप मदत होणार असल्याने मोठा हादरा इतर पक्षांना बसणार आहे. ह्या प्रवेश कार्यक्रमाला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जि. प. अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, मा. जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, जि. प. उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई राठोड, जि. प. सुकाणु समीती सदस्य दिनकरराव खंडारे, ओबीसी नेते एडवोकेट. संतोष रहाटे, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, विकास सदांशिव, शांताराम कवळकार, विनोद भोपळे,अमोल कलोरे व हेमराज काळपांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.










