सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी :- अहेरी तालुक्यातील रहीवासी असलेले चाणक्य अकँडेमी चे संचालक जुगल बोमनवार हे अत्यंत साधे व प्रेमळ स्वभावाचे आहेत.त्यांना शिक्षणाची जास्त आवड.ते नेहमी इतरांचा मदतीला धावुन येत असतात.अहेरी तालुक्यातील ग्रामिण भागातील आदिवासी व गरिब विद्यार्थी शिक्षणापासुन व स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शना पासुन वंचीत राहु नये.याकरिता त्यांनी नेहमीच प्रयत्न सुरू ठेवले.त्यांनी कोरोनाच्या काळात तालुक्यातील ग्रामिण भागात जावुन विद्यार्थांना शिक्षणाचे व स्पर्धा परिक्षेचे महत्व पटवुन देण्याचे त्यांनी प्रयत्न केले.अहेरी तालुक्यातील प्राणहिता येथील उप पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस दलाकडुन ग्रामिण भागातील 150 युवकांना भरती पुर्व पोलीस प्रशिक्षण देण्यात येत आहे.या प्रशिक्षणात लेखी परिक्षेचे मार्गदर्शन चाणक्य अकँडमी चे संचालक जुगल बोमनवार व त्यांचे छोटे बंधु अभिषेक बोमनवार देत आहेत.त्यांनी दिलेल्या योग्य मार्गदर्शनातून 2017-18 मध्ये सागर देवकाटे,ललीता पेंन्दाम व सपना सिडाम यांनी पोलीस दलात उंच भरारी घेतली.तसेच भारतीय सैन्य दलात दानिश शेख यांची निवड झाली. या सर्वांनी श्रेय चाणक्य अकँडमीला दिले आहे. अकँडमीचे संचालक व इतर पदाधिकारींच्या प्रयत्नाने ठिकठिकाणी वाचनालय व स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेे. दि.१९ आक्टोबर २०२१ रोजी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे प्रथमच परिसरातील ईच्छुक विद्यार्थी करिता ब्राईट इन्स्टिट्यूटच्या वरच्या मजल्यावर चाणक्य अकॅडेमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ कडुन गरजू व होतकरू विद्यार्थी करिता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय कार्यक्रमाचे शुभारंभ गडचिरोली जिल्हा परिषदचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले.आलापल्ली हे शहर अहेरी उपविभागात सगळ्या तालुक्याला जोडणारा मुख्य शहर आहे.येथे पाचही तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी आणि विविध भरतीचे प्रशिक्षण व सराव करण्यासाठी ग्रामीण भागातील आलेले गरजू गरीब विद्यार्थी आलापल्ली येथे भाडयाने घर घेऊन मुक्कामी राहून अभ्यास करत आहेत.मात्र या ठिकाणी शैक्षणिक सुविधेपासून अनेक विद्यार्थी वंचित आहेत. योग्य वेळी विद्यार्थीना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विद्यार्थी अतिरिक्त अभ्यास करून देखील यश मिळत नाही. मैदानी शारीरिक सरावा करीता प्रशिक्षक नाही.हे सगळं लक्षात घेता चाणक्य अकॅडमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ कडुन आलापल्ली येथे गरजू व होतकरू विद्यार्थीकरिता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाचे तसेच शारीरिक मैदानी सरावासाठी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे शुभारंभ करण्यात आले.चाणक्य अकॅडमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे आलापल्ली येथे गरजू व होतकरू विद्यार्थीकरिता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाचा कार्यक्रमाला उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अध्यक्ष शंकर मेश्राम (सरपंच ग्राम पंचायत आलापल्ली) प्रमुख पाहुणे भास्कर तलांडे (सभापती पंचायत समिती अहेरी),जुगल बोंमनवार (चाणक्य अकॅडमी संचालक), पाटील सर (पोलीस उपनिरीक्षक),कांबळे सर(पोलीस उपनिरीक्षक)विजय खरवडे (अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी निर्मूलन समिती),चंद्रशेखर पांडे,मिलिंद खोंड,अतुल आत्राम हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अमित येनप्रेड्डीवार हे तर प्रास्ताविक जुगल बोमनवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाणक्य अकँडमीचे पदाधिकारी तसेच आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे सर्वञ कौतुक केले जात आहे.