अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : जिल्यातील विविध तालूक्यात ग्रामीण भागासह शहरात निवड केलेल्या महा ई सेवा केद्राचे यादीवर महा ई सेवा केद्र संघर्ष कृती समितिचे जिल्हाध्यक्ष मनिष तिवारी यांचे नेतॄत्वात आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवण्यात आला यावेळी सर चिटणीस विनोद गवर, जिल्हाउपाध्यक्ष जगदीश देशमूख, अनिल गोपनारायण, सिद्धार्थ मेंढे, अवि तायडे, सिध्देश्वर गावंडे उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, एन आय सी चे प्रमोदसिंह ठाकूर महाआँनलाईन चे समन्वयक चंचल मूजूमदार हजर होते. यावेळी संघटनेने काही महत्वाचे मूद्दे उपस्थित केले असून दिव्यांग सदराखाली निवड केलेल्या केद्रधारकांची पडताळणी शल्य चिकीत्सक यांचेकडून पडताळणी करणे कॉमन सर्व्हिस सेंटर ज्या ठीकाणाच्या आधारे नोंदणी केली त्याच ठीकाणी सेतू केद्र मंजूर झाले काय याची तपासणी करणे लोकसंख्या हा निकष केद्र मंजूर करतांना असला तरी शहरात प्रभागनिहाय लोकसंख्या तपासून केद्र मंजूर करणे तसेच ग्रामिण भागात संग्राम केद्राची संख्या ग्राह्य धरून नविन केद्र मंजूर करणेसह अनेक बाबी उपस्थित केल्या त्यास मा जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवली व नियमानूसारच अंतीम यादी केली जाईल असे आश्वासन दीले असुन तरीही न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा कृती समितिचे सरचिटणीस विनोद गवार यांनी दिला आहे.