सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
दि. २० जून २०२३ वडवणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी एका प्रकरणात १० हजार रूपयांची लाच घेताना उस्मानाबादच्या एनसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनातील पोलिस कर्मचारी काही दिवसांपासून अनेक प्रकरणात अडकत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यांना शेतीच्या वादातून एका शिक्षकावर आणि त्याच्या भावावर वडवणी पोलिस ठाण्यात एन.सी दाखल करण्यात आली होती. हे एन सी प्रकरण निकाली काढण्यासाठी वडवणी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यांनी ५० हजार रूपयांची लाच मागितली परंतु तडजोड करून १० हजार रूपयांची लाच देऊन प्रकरण निकाली काढण्याचे ठरले असता. उस्मानाबादचे पोलिस उपअधीक्षक तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिद्धराम म्हेत्रे आणि त्यांच्या पथकाने वडवणी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यांना १० रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.