अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि : २८/०४/२०२३ रोजी येथील हजरत ख्वाजा सय्यद अब्दुल अजीज उर्फ शाहू शाहबाबू यांच्या उर्स व संदल मिरवणूक महोत्सवाची शांतता समिती ची आढावा बैठकीचे आयोजन बाळापुर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांच्या अध्यक्षतेखाली सायं 5 वाजता करण्यात आले होते.या महत्वपूर्ण बैठकीला पातूरचे नवनिर्वाचित तहसीलदार रवींद्र काळे,नायब तहसीलदार सय्यद अहेसानोद्दीन, पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हरीश गवळी, पोलीस उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती. यावेळी ठाणेदार हरीष गवळी यांनी प्रास्ताविक सादर करून शहरातील ३० एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या संदल मिरवणूक आणि उर्स महोत्सवाची माहिती दिली.याप्रसंगी तहसीलदार रवींद्र काळे, नायब तहसीलदार अहिरसामुद्दीन यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
तर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी मार्गदर्शन करतांना मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था पाळणे गरजेचे असून कुठल्याही प्रकारच्या डीजेला परवानगी राहणार नाही त्यामुळे संदल मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांनी हा उत्सव शांततेत आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासून शांततेत हा उत्सव पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले. आणि कुठलीही मदत लागली तर पोलिसांना सूचना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शांतता समिती बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पातूरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरीश गवळी यांनी यावेळी केले.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन टीमचे सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.