लक्ष्मण पवार
तालुका प्रतिनिधी सुरगाणा
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जगाला सत्य ,अहिंसा, सहिष्णुता याची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे माजी ग्रा.पं. सदस्य पुंडलिक पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून १५३ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी माजी ग्रा.पं .सदस्य पुंडलिक पवार ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश बागुल, हरिष गायकवाड, रामदास गायकवाड, ग्रामस्थ सखाराम धुळे, मोहन पवार, पुंडलिक पवार, हिरामण शिंगाडे,जगन पवार,भूषण जाधव ,उपस्थित होते.