विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : अमरावती हायवे क्रमांक ६ चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच हायवे रोडवर पातुर नंदापूर येण्यासाठी कोळंबीवरून फाटा आहे. त्याच ठिकाणी समोर फुलाचे काम चालू असताना संपूर्णपणे येण्या जाण्याचा मार्ग धोकादायक झाला आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांनी पातुर नंदापूर कडे येणाऱ्या रस्त्यावर भर भक्कम मुरूम टाकल्याने पूर्ण रस्ता चढाचा केला आहे त्यामुळे कोणतेच वाहन उतरायला व चढायला कठीण झाले आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर, अकोला मुर्तीजापुर वरून येणाऱ्या वाहनाला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टू व्हीलर चालताना स्वतः गाडी बंद करून आणावे लागते. या पातुर नंदापूर रोडवर सहा ते सात गावे जोडली गेली आहे. कोळंबे फाट्यावरून पातुर नंदापुरला जाण्यासाठी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रोडवर कोणत्याच प्रकारे चढणे व उतरणे कठीण झाले आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाची जीवित हानी कधीही होऊ शकते याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवासी विचारात आहेत. तरी संबंधित ठेकेदाराने या रोडला व्यवस्थित पातुर नंदापूर येण्यासाठी व्यवस्थित रस्ता करून देण्यात यावा अन्यथा या रोडवरील गाव खेड्यांच्या लोकांचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पातुर नंदापूर चे सरपंच श्री सचिन लाखे यांनी दिला आहे.
हायवे क्रमांक ६ वर चौपदरी करणाचे काम चालू आहे काम व्यवस्थित चालू आहे परंतु पातुर नंदापूरला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो मात्र खूप उंच झाल्यामुळे प्रत्येक वाहनाला जाण्या येण्याचा वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे. या रोडवर कधीही जीवित हानी होऊ शकते संबंधित ठेकेदाराने रस्ता सुरळीत करावा अन्यथा या रोडवरील सर्व गावचे सरपंच व गावकरी च्या माध्यमातूनआंदोलन करण्यात येईल. सचिन लाखे, सरपंच पातुर नंदापूर