देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : 21 ऑगस्ट 2022 रोज रविवारला क्षत्रिय गुर्जर सभागृह गोंदिया येथे संगणक परिचालकांचे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे लोकार्पण सुद्धा यावेळी करण्यात आले. या संघटनेचे रजिस्ट्रेशन क्रमांक एनजीपी 5768 असे आहे.सर्वप्रथम भारत मातेचे प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले, व पाहुण्यांचे स्वागत, स्वागत गीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्रजी साखरे यांनी प्रस्तुत केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, म्हणून श्री. प्रशांतजी डवले, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर कार्यक्रमाचे उद्घाटक,श्री. जितेंद्रजी साखरे, गोंदिया जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गण,श्री. गुणवंतजी राठोड जिल्हाध्यक्ष यवतमाल.सौ. सुनिताताई आमटे अहमदनगर आणि इतर उपस्थित मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आपापल्या परीने संघटनेला कसे पुढे न्यायचे, पुढील वाटचाल कशी असेल, व आपल्याला सर्वांनी मिळून कश्या पद्धतीने कामे करायचे आहे, याबद्दल मार्गदर्शक यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.ह्या मेळाव्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका प्रतिनिधी,व गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला प्रतिनिधी, व संगणक परिचालक हजारोच्या संख्येत उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे संचालन श्री. देवा उईके व श्री. रोहित पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. टोलीरामजी नेरकर यांनी मानले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)