महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.7:- येथील ग्रामोदय संघाचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. सी. श्रीवास्तव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली. डॉ.श्रीवास्तव यांनी सिरॅमिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने त्यांची दखल घेतली. हरियाणा राज्यात एका कार्यक्रमात ‘एसेंट्रीक परफार्मर अवार्ड’ पुरस्कार प्रदान करुन या संस्थेने डॉ.श्रीवास्तव यांना सन्मानित
केले. सन्मान चिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. श्रीवास्तव यांनी सिरॅमिक इंजिनिअरिंगमध्ये गेली ५० वर्षे सेवा दिली आहे. तसेच सिरॅमिकशी संबंधित ‘एनसायक्लोपिडीया ऑफ इंडियन माॅडर्न पाॅटरी’ या ४०० पृष्ठांच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. याबद्दल जर्मनी येथील इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटीने डाक्टरेट पदवी बहाल केली. विविध हस्तपुस्तिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन चंदीगढ येथे ‘इंडिया ग्लोरी अवार्ड-२०२२’ ने त्यांना सन्मानित करण्यात
आले होते. नुकत्याच मिळालेल्या ‘एसेंट्रीक परफार्मर अवार्ड’ पुरस्काराबद्दल ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार चौधरी, सचिव अय्युब हुसेन आणि ग्रामोदय संघाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.











