विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : दि.२४ मे रोजी जिल्हाधिकारी निमा अरोरा कारंजा रोड वरून जात असताना पिंजर कारंजा बायपास वर ८० हजार विटा चीअवैधरित्या भट्टी दिसली. जिल्हाधिकारी ही भट्टी राज्य महामार्ग लगत लागूनच सुरू असताना िल्हाधिकार्यांनी विचारपूस करीत असतांना बार्शी टाकळी येथील तहसीलदार गजानन हामंद यांना तात्काळ फोन करून जीसीपी मागून घेतले व पिंजर येथील अवैधरीत्या चालू असलेल्या वीटभट्टी नष्ट करण्याचे आदेश दिला. काही वेळातच दोन जेसीबी आल्या आणि ८० हजार न घातलेली वीट भट्टी नष्ट करण्यात आली. या बेधडक कारवाईमुळे परिसरातील वीट भट्टी धारक हादरून गेले आहे. वीट भट्टी धारकाला नियमावली दिल्याप्रमाणे त्याचे पालन होत नसल्यामुळे राज्य महामार्ग यांचे पासून २०० मीटर अंतरावर वीटभट्टी असायला पाहिजे. परंतु वीटभट्ट्या रोडला लागूनच चालू आहेत. शिवाय एका वीट भट्टी पासून दुसऱ्या वीट भट्टी पर्यंत वीट भट्टी चे अंतर १ किलोमीटर असणे आवश्यक आहे. त्यातच वन विभाग, प्रदूषण विभागाची सुद्धा परवानगी असणे आवश्यक आहे. वीट भट्टी धारकाला याआधीच नोटीस बजावला होता. त्यांचे हमीपत्र सुद्धा भरून घेतले होते. तरीसुद्धा बेकायदेशीर या वीटभट्ट्या चालू असल्यामुळे बेधडक कारवाई करण्यात आली आहे. सदर व कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गजानन हामंद, मंडळाधिकारी श्रवण भराडी, तलाठी मनीष हळदे, राजेश धामणेकर, अरुण घाडगे, पिंजर पोलिस स्टेशनचे जमादार रमेश पाटील खंडारे, सुदाम राठोड, मुकेश जाधव यांनी मी कारवाई केली आहे.











