विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर नंदापूर येथे दि.२४ मे रोजी १२ च्या दरम्यान पोलीस गस्त घालीत असताना. पातुर नंदापूर चा नदीपात्रामध्ये हातभट्टीची दारू निघत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला तेव्हाच पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड कॉ. राजू वानखेडे, पो, कॉ, अभिजीत शिरसाट, सतीश पाटील, यांनी नदीपात्रामध्ये जाऊन ३० डब्बे मोहाचा सडका माल व ३० लिटर गावरान हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या मालाचे अंदाजे किंमत ४० हजार ५०० रुपये इतकी आहे. पिंजर परिसरातील या आधी सुद्धा अजयकुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे याआधी सुद्धा परिसरात गांजाची अवैद्य तस्करी करणाऱ्या व कारवाई केली आहे आणि त्यातच पातुर प नंदापूर येथे गावठी भट्टीवर धडक कारवाई केली असून गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास अजयकुमार वाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू वानखडे, अभिजीत शिरसाट, सतीश पाटील करीत आहे.











