अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर येथे राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य सेल व फ्रंटल समन्वयक सुहासजी उभे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संग्रामभैया गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष शिवा मोहोड पातूर न.प चे माजी नगराध्यक्ष हिदायत खा रूम खा यांच्या सह राष्ट्रवादी चे सर्व पदाधिकारी व युवकांच्या उपस्थिती मध्ये गेल्या 5 वर्षा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक महासचिव पदावर काम करत होते पातूर येथे झालेल्या राष्ट्रवादी आढावा बैठक मध्ये राहुल वाघमारे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पातूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.