अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर मार्गाच्या (अकोला निमकर्दा पारस ) कामा बाबत फसवे आश्वासने देऊन श्री भक्तांचा अपमान केल्या मूळे बांधकाम विभागावर जाहीर धूळ फेक आंदोलन गोपाल पोहरे.
2017 मध्ये “HAM PROJECT” अंतर्गत अकोला निंमकर्दा पारस रस्त्याच्या नवनिर्माणाच काम चालू झाले होते.आज त्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.मात्र रस्त्याचे काम अजूनही प्रगतीपथावरच आहे ऐकी कडे अवघ्या २४ तासात ३० किमी रस्त्याचे काम पूर्ण करणारे केंद्र सरकारचे दावे कुठ आणि ४ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आमच्या अकोला – पारस २५ किमी रस्त्याचे अर्धवट व निकृष्ट काम कुठ अत्यंत निकृष्ट व कासव गतीने होत असलेल्या या रस्त्याचे काम पाहून 2020 मध्ये निवेदने देऊन संबंधित विभागाला वेळोवेळी सदर मार्गावर होत असलेल्या अनियमतते बाबत, भ्रष्टाचार बाबत अवगत करणे चालू केल, रस्त्याच्या कामाच्या विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आजपवतो वेळोवेळी आंदोलने उपोषणे या ठिकाणी केलेली आहेत त्याची माहिती आपणा सर्वांना आहेच मात्र प्रत्येक वेळी संबंधित जबाबदार अधिकारी व विभागाणे लेखी व तोंडी फसवी, खोटी आश्वासने देऊन जिल्यातील नागरिकांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.रोज सदर मार्गावर भ्रष्ट अधिकारी व सडक्या लोकप्रिनिधींनच्या गलथान कारभारामुळे अपघात हे होतच असतात, त्यात कितेक नागरिकांचे हात पाय निकामी होऊन कायमचे अपंगत्व आल्याचे निदर्शनास येते.ST बंद, प्रायव्हेट वाहने बंद, जे वाहने चालू आहेत त्यात अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे.खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर रुग्णवाहिका बंद पडत असल्या मुळे रुग्णांचे बेहाल शेतकऱ्यांचे हाल हाल.असो प्रवासी नागरिकांना होत असलेल्या नाहक त्रासाचे वर्णन न केलेलेच बरे कारण लोकप्रतिनिधी मलाई लाटून सट्ट आणि त्यातील उरली सुरली मलाई खाऊन अधिकारी स्वस्थ पडले आहेत.साहेबाना त्याच काय देणंघेणं. अशी एकंदरीत रस्त्याची गंभीर परिस्थिती असताना दोन तीन महिन्या आधी भीक मांगो आंदोलन करून अवघे तेवीस रुपये विभागाला आर्थिक मदत पाठवली होती भीक मागून रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठवलेल्या हा निधी त्यात सुध्दा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अपहार तर केला नाहीना, हे पुन्हा पुन्हा बंद पडत असणाऱ्या कामावरून सामान्य जनतेस याठिकाणी यक्ष प्रश्न पडत आहे.मात्र मागील वर्षी पासूनच श्री संत गजानन महाराजांच्या पालखी विषयी विभागाला कळवत आहोत आणि अवघ्या काही दिवसांवर पालखी “वारी” निघणार असून ज्या प्रमाणे प्रवासी नागरिकांचे रस्त्याच्या दुर्दशेमुळे हाल होत आहेत , त्याच प्रमाणे पालखीतील वारकऱ्यांचे सुद्धा हाल या ठिकाणी होणार असल्याचे प्रकर्षाने नमूद करावे वाटते..मागील आंदोलन वेळी १५ एप्रिल पर्यंत अकोला ते पारस रस्त्याचे काम पूर्ण करू असे विभागाच्या वतीने आश्वस्थ केले होते ते फसवे आश्वासनं अधिकाऱ्यांनी केव्हाच हवेत विरवलेले दिसते.मात्र कामाची संथ गती पाहता अजून पाच वर्षे रस्त्याचे काम पूर्ण व्हायला लागतील त्यालाच कंटाळून उद्याचे आंदोलन छेडण्यात येणार आहे. निमकर्दा आणि गायगाव इत्यादी नागरी वसाहती सोडल्यास कुठेच पाणी मारल्या जात नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट रस्त्यावर उडत असतात, हेच धुळीचे लोट व श्री भक्तांचे हाल रोखण्यासाठी, रस्त्याचे निकृष्ट व दर्जाहीन काम चांगले होण्यासाठी श्रीभक्त व प्रवासी नागरीकांच्या मागण्या घेऊन “जाहीर धूळ फेक आंदोल” या ठिकाणी करण्यात येणार आहे. भ्रष्टलोकप्रिनिधी आणि भ्रष्टआधिकरी यांनी वेळीच दखल घेऊन कामात प्रगती, दर्जोन्नती करावी अन्यथा यापुढे अनेक संघटना, पक्ष, व सर्वसामान्य नागरिक विभागावर धूळफेक चिखलफेक ई. प्रमाणे आंदोलने उग्र स्वरूपात करतील.गोपाल पोहरे
टीप ~ सर्वच पक्षातील नेत्यांना जाहीर आवाहन भोंग्या पोंग्याचे आंदोलन बंद करून जनहिताच्या मुद्द्यांवर आंदोलने छेडून दाखवाच