विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: काल एका शिवसेनेच्या सभेमध्ये आमदार बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यावर निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पैसे घेतल्या चा आरोप केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसेनेचा आमदार यांचा तीव्र निषेध केला असता
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ठीक ठिकाणी आंदोलने करतील असा इशाराही प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहूजन आघाडी वर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या जुगारी आणि दोन नंबरच्या धंदा करणाऱ्या पाचवी फेल आमदार संत्या बांगरचा आम्ही आज निषेध करतो. आमदार सत्य बांगर यांचा पुतळा जाळून आणि घागर फोडून श्रद्धांजली वाहिली. अकोल्यातील युवा कार्यकर्त्यांनी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, जय तायडे, धीरज इंगळे, सचिन डोंगरे, गोलू खिल्लारे, श्रीकांत घोगरे, आकाश गवई, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत राधाकृष्ण टॉकीज समोर पुतळा जाळून त्याला श्रद्धांजली वाहिली.
ह्यावेळी सुधीर दिरंगणे, स्वप्नील बागडे, विकि कांबळे, अजय अंभोरे, योगेश नाईक, भीमराव वरघट, लवेश वरघट, साहिल गोपणारायन, अनिकेत शिरसाट, ह्यांचे सह युवा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)