शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : देशसेवा करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे मनोबल व उत्साह वाढविने हे आपले कर्तव्य असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला खंडाळा येथील जवान प्रशांत प्रकाश खंडेराव यांनी इंडियन आर्मी बटालियन मध्ये प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल बटालियन तर्फे 1 जानेवारी 2022 रोजी सन्मानित करण्यात आले या बद्दल खंडाळा ता तेल्हारा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्काराचे आयोजन 12 मार्च रोजी करण्यात आले या वेळी ग्रामपंचायत सदस्या सौ वर्षांताइ योगेश वाघोडे यांचे अध्यक्षतेखाली राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे राज्य सचिव राजेश डांगटे सहसचिव अविनाश राठोड विभागीय अध्यक्ष अहेमद शेख जिल्हाध्यक्ष अॅड नरेंद्र बेलसरे उपाध्यक्ष मनोहर गोलाईत , उपाध्यक्ष कमलेश राठी जिल्हा सचिव डाॅ संतोष ताकोते जिल्हापदाधीकारी आर्किटेक्ट अनंत गावंडे सहसचिव निरंजन गावंडे, सहसचीव विठ्ठल येवोकार तेल्हारा ता अध्यक्ष सिध्दार्थ गवारगुरु, तेल्हारा तहसिलदार राजेश गुरव हिवरखेड पो स्टेशन चे स पो नि गोपाल दातिर यांचे उपस्थितीत नायक प्रशांत खंडेराव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आपला मुलगा देशसेवा करण्यासाठी असल्याचा अभिमान बाळगणारे त्यांचे आई वडील यांचा सत्कार जिल्हा सचिव डाॅ संतोष ताकोते व त्यांच्या पत्नी सौ शारदाताई यांनी साडीचोळी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच सौ मीनाताई शेखर तेलगोटे यांनी सुद्धा सत्कार केला खंडाळा गावात शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी पत्रकार मनोहर गोलाईत मा सरपंच बलवंत सांगुनवेढे यांचा सिंहाचा वाटा असल्याचा मि प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे बेलसरे यांनी सांगुन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला देशसेवा करणे हे आपले कर्तव्य आहे या करिता प्रत्येक आईवडील व शिक्षक यांनी प्रवृत्त करण्यासाठी गरज आहे असे मत प्रशांत खंडेराव याने व्यक्त केले यावेळी माजी सैनिक ज्ञानेश्वर बुरकले,राजेंद्र गावंडे संजय जाधव,यांचा सत्कार करण्यात आला . देशाप्रती व सैन्याप्रति अभिमान असणे गरजेचे आहे. या वेळी पत्रकार संघाचे आकोट तालुकाध्यक्ष विठ्ठल गुजरकर नरेंद्र कोंडे गोवर्धन चव्हाण काशिनाथ कोंडे स्वप्निल इंगळे,शरद भेंडे,दत्ता भगत,साधु बुवा खोटरे गणेश वाकोडे तेल्हारा येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सिंगणारे तालुक्यातील महादेव वानखडे हिवरखेड शहराध्यक्ष गजानन राठोड नंदु नागापुरे अर्जुन खिरोडकार शेख राजु मुदतशिर खान अजहर सागर खराटे पवन नेरकर सुरजुसे सर प्रेमसागर वानखडे आशिष वानखडे डाॅ सुशिर यांचेसह बरेच पत्रकार हजर होते कार्यक्रमाचे संचालन प्रा अनंतराव मधुसूदन गावंडे तर आभार तेल्हारा तालुका सचिव सुनिल तायडे यांनी केले