सहा आरोपी पोलीसांच्या ताब्यात.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विहीरगाव येथील जंगल परिसरात अवैध रित्या कोंबडा बाजार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी सदर कोंबडा बाजार वर धाड टाकून कारवाई केल्याची घटना 30 जानेवारी रोजी घडली.कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा माल जप्त केलेले असुन सहा आरोपीना ताब्यात घेतले आहे.प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात कोंबडा बाजार भरविण्यावर बंदी आहे.कोरोना संसर्गाच्या पार्शभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आव्हान केले.असे असतानाही काही नागरिक देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव जंगल परिसरात अवैधरित्या कोंबडा बाजार भरविण्यात येत होता.याची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर कोंबडा बाजारावर धाड टाकून कारवाई केली.कोंबडा बाजारावर धाड टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपीमध्ये अब्दुल कलीम मस्जिद शेख (49)रा.जवाहर वार्ड देसाईगंज, बलदेव श्रवण शेलोटे (55) रा.आमगाव,तेजराम रावजी बोडे (50), एकनाथ गजानन भर यांचे समावेश आहे.