38 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागात असलेले उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे प्रजासत्ताक दिनाचे आैचित्य साधुन माऊली बहुद्देशीय संस्था व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या माध्यमातुन भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर शिबीराच्या कार्यक्रमात माहुली बहुउद्देशीय संस्थेचे सुहास खरे यांनी अति दुर्गम ग्रामिण भागात त्यांच्या संस्थेमार्फतीने राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत माहीती दिली.त्यानंतर रोटरी क्लब व लाईफ लाईन ब्लड बँक नागपुरचे वरभे यांनी रक्तदान व नेञ तपासणी बाबत माहीती दिली.या शिबिरामध्ये एकुण परिसरातील 38 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला.यापुर्वी 10 जानेवारीला माहुली बहुद्देशीय संस्थेकडुन पेरमिली हद्दीतील कोरेल्ली(खु),कचलेर व हिनभट्टी या अती दुर्गम भागातील गरिब आदिवासींना 100 साड्या,200 ब्लाकेट व 100 मुलांना कपडे व शालेय साहीत्य वाटप करण्यात आले होते.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता सिआरपीएफचे अधिकारी संतोष कुमार,प्रभारी अधिकारी धवल देशमुख,पोउपनी गंगाधर जाधव, जिल्हा पोलिस,एसआरपीएफ व सिआरपीएफ चे अमलदारांनी उत्स्फूर्तपणे श्रम घेतले.