लाखो रूपयांचे नुकसान.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/जारावंडी:- गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी येथे ट्रक्टरने शेतातील धानाची मळणी करित असतांना पुंजण्याला आग लागून शेतातील धान व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना दि.18 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली.यात अंदाजे 350 च्या जवळपास धानाचे भारे जळून नुकसान झाल्याचे समजते.रंजना गोविंद कोडापे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.रंजना कोडापे यांनी जारावंडी येथील शेतशिवारात धानाचे पुंजने ठेवले होते.अशातच धान मळणी करण्याकरिता दुपारी ट्रँक्टर लावून मळणीला सुरवात केली.धानाची मळणी करित असतांना अचानक पणे ट्रँक्टर ला आग लागली.पाहता पाहता काही कळायचा आतच आगीने रौद्ररूप धारण केले.आग एवढी भयानक होती की,ट्रँक्टर काढायला सुद्धा वेळ मिळाली नाही. अशातच संपूर्ण ट्रक्टर जळून खाक झाली आहे.सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे जवळपास 60 ते 70 हजारांचे नुकसान झाले आहे.ट्रक्टर मालकाचे सुद्धा लाखोंचे नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहीती मिळताच जारावंडीचे तलाठी पराते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.