दिलेल्या प्रसिध्दीपञकात घुटे यांनी सर्व आरोप फेटाळले.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- माझ्यावर आरोप केल्या जात आहेत हे सर्व चुकीचे असून मी सुभाष घुटे तालुका प्रमुख पाचही तालुक्यामधून मी शिवसेनेचा अधिकृत पदाधिकारी आहे.मी कोणत्याही पदाचा गैरवापर केलेला नाही.माझ्याकडे जिल्हाप्रमुख यांनी तोंडी आदेश भामरागड नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती केली होती.त्यानुसार पूर्ण ताकत झोकून मी काम केले.परंतु भामरागड मध्ये नगरपंचायत शिवसेनेचा भगवा हा फळकणार आहे.हे लक्षात येताच याचे श्रेय लाटण्याकरिता जिल्हा प्रमुख आणि गडचिरोली जिल्हातील संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी जे अधिकृत नाही अशा लोकांनी मला बदनाम करण्याचा कट रचला आहे. यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील शिवसैनिकांचा विश्वास उडाला आहे. शिवसैनिकामध्ये संभ्रम निर्माण करून फूट पाडण्याचा षडयंत्र सुरु आहे. पण शिवसैनिकानी एक निष्ठा राहून काम करावे.असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळले. शिवसेनेचे सुभाष घुटे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.