अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 693 अहवाल प्राप्त झाले. त्यात 153 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 27 असे एकूण 180 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58519(43766+14489+264) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 153 व खाजगी 27) 180 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 19 = एकूण पॉझिटीव्ह 199.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 348786 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 344938 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3446 नमुने होते. आजपर्यंत एकूण 348786 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 305020 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 180 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 153 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 62 महिला व 91 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 107 जण हे अकोला शहरातील, अकोट तालुक्यातील 20 जण, मुर्तिजापूर येथील 13, अकोला ग्रामीण येथील पाच, बार्शीटाकळी येथील चार, पातूर येथील तीन व बाळापूर येथील एक रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 180 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
25 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
587 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58519(43766+14489+264)आहे. त्यात 1143 मृत झाले आहेत. तर 56789 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 587 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 628 चाचण्यात 19 पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 628 चाचण्या झाल्या त्यात 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात बार्शीटाकळी येथे पाच, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे प्रत्येकी दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 188, आरोग्य कर्मचारी 77 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामिण येथे 247 चाचण्यात दोन, अकोट येथे सहा चाचण्यात तीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 56 चाचण्यात दोन व हेडगेवार लॅब येथे 41 चाचण्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण 628 चाचण्यात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.